मराठी कॅलेंडर सप्टेंबर २०२१
श्रावण / भाद्रपद शके १९४३
बुधवार दिनांक १: शुभ दिवस (सायं. ५.२५ प.) बुधपूजन । मंगलनाथ महाराज जन्मोत्सव - सं. चित्रकूट (इंदौर)
गुरुवार दिनांक २: बृहस्पती पूजन | जागतिक नारळ दिन
शुक्रवार दिनांक ३: शुभ दिवस (स. १०.०८ नं.) । अजा एकादशी । जरा-जिवंतिका पूजन । पर्युषण पर्वारंभ (चतुर्थी पक्ष-जैन) नारायण महाराज पुण्यतिथी - नेर (यवतमाळ)
शनिवार दिनांक ४: शुभ दिवस (स. ८.२४ प.) । अश्वत्थमारुती पूजन । शनिप्रदोष । संत सेना महाराज पुण्यतिथी । शिवस्वरूपानंद स्वामी पाठक पुण्यतिथी - कारंजा (वाशीम) । पर्युषण पर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन)
रविवार दिनांक ५: शिवरात्री । आदित्य पूजन । संत ताजुद्दीनबाबा पुण्यतिथी - नागपूर । शिक्षक दिन | आंतरराष्ट्रीय चॅरिटी डे
सोमवार दिनांक ६: श्रावण अमावस्या । दर्श अमावस्या । पिठोरी अमावस्या । सोमवती अमावस्या । सकाळी ०७.३८ नंतर । अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) । पोळा । मातृदिन । श्रावणी सोमवार शिवपूजन । शिवामूठ : सातू । अण्णामहाराज (धांण्देशास्त्री) जन्मोत्सव - इंदौर अमावस्या प्रारंभ सकाळी ०७.३८
मंगळवार दिनांक ७: भाद्रपद मासारंभ । राजे उमाजी नाईक जयंती । अमरदासबाबा पुण्यतिथी - रिसोड (वाशीम) | अमावस्या समाप्ती पहाटे ०६.२१ | ब्राझिलियन स्वातंत्र्य दिन
बुधवार दिनांक ८: शुभ दिवस । चंद्रदर्शन । चक्रधरस्वामी जयंती । चांगदेव राऊळ जयंती - पैठण । शांतीसागर महाराज पुण्यतिथी - कुंथलगिरी (बीड) | आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
गुरुवार दिनांक ९: शुभ दिवस । हरितालिका तृतीया । सामश्रावणी । स्वर्णगौरी व्रत । वराह जयंती । मुस्लिम सफर मासारंभ
शुक्रवार दिनांक १०: श्री गणेश चतुर्थी । पार्थिव गणपती पूजन । चंद्रदर्शन निषेध (चंद्रास्त रात्रौ ०९.२३) । यशवंतबाबा पुण्यतिथी - मुसळखेडा (अमरावती) । जैन संवत्सर (चतुर्थी पक्ष)
शनिवार दिनांक ११: शुभ दिवस (स. ११.२२ प.) । ऋषिपंचमी । गजानन महाराज पुण्यतिथी - शेगांव । कालावतीदेवी जयंती - बेळगाव । जैन संवत्सर (पंचमी पक्ष) | देशभक्त दिन | जागतिक प्रथमोपचार दिन
रविवार दिनांक १२: शुभ दिवस (स. ११.४२ नं) । सूर्यषष्ठी । जेष्ठागौरी आवाहन सकाळी ०९.४९ नंतर
सोमवार दिनांक १३: जेष्ठागौरी पूजन । सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश वाहन : म्हैस
मंगळवार दिनांक १४: दुर्गाष्टमी । भागवत सप्ताहारंभ । जेष्ठागौरी विसर्जन सकाळी ०७.०४ नंतर । दोरक धारण । महर्षी दधीची जयंती
बुधवार दिनांक १५: अदुःख नवमी । पारशी अर्दिबेहस्त मासारंभ । श्रीचंद्र जयंती उदासी सांप्र. महोत्सव – वाशिम | अभियंता दिन | आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
गुरुवार दिनांक १६: शुभ दिवस (रात्रौ ८.५० प.) । योम किप्पूर (ज्यू) । देवमामलेदार यशवंत महाराज प्रागट्य सोहळा - सटाणा (नाशिक) । रामानंद महाराज पुण्यतिथी - पाटणबोरी (यवतमाळ) | मलेशिया डे | जागतिक ओझोन दिन
शुक्रवार दिनांक १७: शुभ दिवस (स. ०८.०७ नं) परिवर्तिनी एकादशी । वामन जयंती । श्रावणोपास
शनिवार दिनांक १८: शनिप्रदोष । मदन महाराज यात्रा - फुलआमला नांदगाव (अमरावती) । गुलाबराव महाराज पुण्यतिथी - माधान (अमरावती)
रविवार दिनांक १९: शुभ दिवस । अनंत चतुर्दशी । जंगलीदास महाराज प्रकट दिन - कोकमठाण (कोपरगांव)
सोमवार दिनांक २०: भाद्रपद पौर्णिमा । प्रौष्ठपदी पौर्णिमा । संन्यासीजनांचा चातुर्मास्य समाप्ती । पौर्णिमा प्रारंभ पहाटे ०५.२८
मंगळवार दिनांक २१: शुभ दिवस । महालयारंभ । प्रतिपदा श्राद्ध । सुक्कोथ (ज्यू) । इस्तारी महाराज पुण्यतिथी - पांढरवडा (यवतमाळ)
बुधवार दिनांक २२: द्वितीया श्राद्ध
गुरुवार दिनांक २३: शुभ दिवस (रात्रौ ७.३७ प.) । तृतीय श्राद्ध । विषुवदिन | जागतिक साइन भाषा दिन
शुक्रवार दिनांक २४: शुभ दिवस (स. ८.२९ नं) । चतुर्थी श्राद्ध । भरणी श्राद्ध । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८.४३ । सत्यदेव महाराज पुण्यतिथी - नवी भारवाडी (अमरावती)
शनिवार दिनांक २५: पंचमी श्राद्ध
रविवार दिनांक २६: शुभ दिवस (दु. २.३२ नं.) । षष्ठी श्राद्ध | जागतिक गर्भनिरोधक दिन | जागतिक नद्यांचा दिवस
सोमवार दिनांक २७: शुभ दिवस (दु. ३.४२ प.) । श्री ज्ञानेश्वर जयंती । सूर्याचा हस्त नक्षत्रप्रवेश वाहन : घोडा । सती जानकीमाता पुण्यतिथी - काटोल (नागपूर) | जागतिक पर्यटन दिन
मंगळवार दिनांक २८: शुभ दिवस (सायं. ५.४८ नं.) । सप्तमी श्राद्ध । दत्तगीर महाराज पुण्यतिथी - हिवरा संगम (पुसद) | जागतिक रेबीज दिन
बुधवार दिनांक २९: कालाष्टमी । अष्टमी श्राद्ध । सिम्हथ तोराह (ज्यू) । मध्याष्टमी श्राद्ध | जागतिक हृदयदिन
गुरुवार दिनांक ३०: शुभ दिवस । नवमी श्राद्ध । गुरुपुष्यामृतयोग उत्तररात्रौ ०१.३२ पासून । दुसऱ्या सकाळी ०६.३१ पर्यंत । सोनाजी महाराज पुण्यतिथी - माहूर कवठा (बाळापूर) । अविधवा नवमी । सच्चिदानंद स्वामी पुण्यतिथी - रावेर (जळगाव) | जागतिक सागरी दिवस | आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन